भारतामध्ये चीन नव्हे तर युरोपातून फोफावलेल्या कोरोना व्हायरसचे जास्त प्रकरणं : स्टडी

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसवर सतत रिसर्चचे काम सुरू आहे. शास्त्रज्ञ हे शोधण्याचा प्रयतन करत आहेत की, कोविड-19 नावाचा हा व्हायरस अखेर किती धोकादायक आहे किंवा तो रूग्णांचे किती नुकसान करत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या नव्या प्रकाराला सार्स-कोव्ह-2 असे शास्त्रीय नाव दिले होते. भारतात बहुतांश कोरोनाचे प्रकार युरोपहून प्रवासी घेऊन आले आणि याचाच प्रभाव भारतात जास्त आहे. कोरोनाची सुरूवात चीनच्या वुहानमधून झाली होती, परंतु, वेगवेगळ्या देशात पोहचल्यानंतर या व्हायरसने आपले रंग बदले.

अभ्यासात काय समजले
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीने शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या समोर एक रिपोर्ट सादर केला. मिळालेल्या माहितीनुसार, यात म्हटले आहे की, भारतात कोरोनाचे बहुतांश स्ट्रेन युरोप आणि सौदी अरबमधून आले. मात्र, जानेवारीच्या सुरूवातीला भारतात कोरोनाचे काही वेरियंट चीनमधून सुद्धा आले होते. अभ्यासात समजले की, सार्स कोव्ह-2 च्या डी164जी ज्या वेरियंटमध्ये आता थोडी कमतरता येत आहे. हे वेरियंट दिल्लीत जास्त आहे आणि याच कारणामुळे कोरोनाच्या ट्रान्समिशनमध्ये येथे आता घसरण येत आहे.

लॉकडाऊनचा झाला फायदा
शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, देशभरात लॉकडाऊनचा खुप चांगला फायदा झाला. विशेषता मार्च आणि मेच्या दरम्यान लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरस पसरू शकला नाही. या दरम्यान देशात अंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उड्डाणे सुद्धा बंद होती. यामुळे देशात कोरोनाचे वेगवेगळे वेरियंट पसरू शकले नाहीत. भारतासारख्या मोठ्या देशात कोरोना वेगवेगळ्या पद्धतीने लोकांवर परिणाम करत आहे.

मृत्यूदर कमी झाला
देशात कोविड-19 मधून आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 11 लाखांवर पोहचली आहे, तर या महामारीत होणार्‍या मृत्यूचा दर 2.15 टक्के आहे. तर जूनमध्ये हा आकडा 3.33 टक्के होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, मार्चमध्ये लॉकडाऊनचा पहिला फेज लागू केल्यानंतर देशात कोविड-19चा मृत्यूदर प्रथमच इतका कमी झाला आहे. भारताने अजूनही कोविड-19 मृत्युदर कायम ठेवला आहे.