दहशतवाद रोखण्याच्या मुद्द्यावर भारत-सौदीचे  एकमत, ५ महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हे भारतभेटीवर आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि सौदी अरेबियामध्ये पाच महत्तवपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सयुंक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवादाविरोधात लढण्याची गरज व्यक्त केली. सौदीच्या राजपुत्रांनीही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भारत आणि सौदी अरबचे व्यापारी संबंध
सौदी अरब हा भारताचा चौथा मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत एकूण कच्च्या तेलापैकी १७ टक्के तेल सौदीकडून घेतो. २०१७ -१८ मध्ये भारत आणि सौदी दरम्यानचा व्यापार २७.४८ बिलीयन डॉलरचा होता. २०१८ साली हा व्यापार १९.६४ बिलीयन डॉलरचा आहे.

सौदी अरब ही जगातील १५ व्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण मालापैकी १.८५ टक्के माल सौदीच्या बाजारपेठेत जातो. तसेच, आयात मालासाठी भारतासाठी हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताच्या आयातीपैकी ४.७४ टक्के आयात सौदीतून केली जाते.

सौदी अरब हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशापैकी आहे. व्दिपक्षीय संबंध दृढ झाल्यास सौदी भारतात गुंतवणूक करू शकतो. महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे जगातील मोठ्या रिफायनरीपैकी एक असणारी कंपनी स्थापण्याची घोषणा सौदी अरबची तेल कंपनी अरमाकोने केली आहे. ही रिफायनरी ४४ बिलियन डॉलरची असेल.

सौदी अरब भारतात थेट गुंतवणूक सुद्धा करू शकतो. २००४ ते २००८ या काळात सौदीने भारतात २१.५५ मिलीयन डॉलरची गुंतवणूक केली आहे. सौदीत जवळपास ३० लाख भारतीय राहतात. तिथे भारतीयांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. तेथील भारतीय दरवर्षी भारतात १० बिलीयन डॉलर पाठवतात.