काय सांगता ! होय, कोरोनाची लस घ्या अन् मिळवा मोफत जेवण, दारू आणि बरंच काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अनेक देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असून लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी अन् खासगी कंपन्या विविध ऑफर देत आहेत. यात हॉटेलमध्ये मोफत जेवणापासून मोफत बीअर, स्वस्त दारू आणि गांजापर्यंतच्या ऑफरचा समावेश आहे. प्रसिद्ध उबर कॅब सर्व्हिसने लस घेणा-यांना खास ऑफर दिली आहे. यात ते 1.5 रुपयांपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा देत आहेत. यातून लोक लस घेण्यासाठी मोफत कॅबन जावू शकतात.

तसेच अमेरिकेच्या ओहियो येथील मार्केट गार्डन ब्रूवरीने लस घेणाऱ्या पहिल्या 2021 लोकांना 5 वेळा मोफत बिअर पाजण्याची ऑफर दिली आहे. चीनमध्येही लस घेणा-यांना सरकार आणि कंपन्या विविध ऑफर देत आहेत. तर हेनान राज्यातील सरकारने लस न घेणाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यासोबत त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क आणि घरही जप्त करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेतही मॅक डोनल्ड्स, AT&T. इन्साकार्ट, टारगेट, ट्रेडर जोस, कोबानी यासारख्या कंपन्यांनी लस घेणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या अन् पैसे देण्याची घोषणाही केली आहे. इतकेच नाही तर लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना 30 डॉलर म्हणजेच 2200 रुपयांपर्यंतच भाड देण्याचीही घोषणा केली आहे.