ऑनलाइन शोधत असाल आपले प्रेम? तर जाणून घ्या ‘ही’ गोष्ट, अनेक डेटिंग अ‍ॅपने केला मोठा फेरबदल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तंत्रज्ञानाच्या या युगात डेटिंग अ‍ॅप अनेकांचे आवडीचे आहे. कोरोना काळात तर याचे महत्व आणखी वाढले आहे. विशेषकरून लोकांमध्ये ऑनलाइन डेटिंग करण्याच्या प्रकारात सुद्धा वाढ झाली आहे.

सामान्यपणे डेटिंगसाठी आपण एखादी अशी व्यक्ती शोधतो जी दिसायला चांगली असेल, तिचे स्वताचे विचार असतील, चर्चा करण्यात बोरिंग नसावा आणि त्याच्यामध्ये एकप्रकारची शालीनता सुद्धा असावी. हे काही महत्वाचे फॅक्टर आहेत, जे जवळपास सर्वचजण शोधतात. आता यामध्ये एका नवीन गोष्टीचा समावेश झाला आहे.

अनेक लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप जसे की, टिंडर, बम्बल, ओके क्यूपिड इत्यादीच्या डाटानुसार, आता अनेक यूजर्स अशा लोकांना शोधत आहेत ज्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे किंवा लवकरच घेण्याचे ठरवले आहेत.

’द गार्डियन’च्या एका रिपोर्टनुसार ’इलेट डेट’ नावाच्या एका अ‍ॅपने तर रितसर ’व्हॅक्सीन स्टेटस’ नावाने एका वेगळ्या सेक्शनचा समावेश केला आहे. याचा हेतू हा आहे की, यूजर्स असे स्टेटस असलेल्या म्हणजे व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांना सहजपण अ‍ॅपवर शोधू शकतात.

बायोडेटामध्ये व्हॅक्सीनेशनच्या माहितीला महत्व
इतकेच नव्हे, अनेक यूजर्स अ‍ॅपमध्ये आपल्या बायोडेटामध्ये ’व्हॅक्सीनेशन’, ’शॉट्स’ सारख्या शब्दाचा वापर करत आहेत. तसेच अनेक यूजर्स इतर लोकांना केवळ यासाठी टाळत आहेत कारण त्यांनी व्हॅक्सीन घेतलेली नाही किंवा याबाबत काही वेगळे मत आहे.

ओके क्युपिडचे प्रवक्ता मायकल केई यांनी सांगितले की, सध्या डेटिंग अ‍ॅपमध्ये व्हॅक्सीनेशनची माहिती देणे सर्वात हॉट ट्रेंड झाला आहे. ज्या लोकांनी व्हॅक्सीन घेतली आहे त्यांना जास्त लाईक्स मिळत आहेत.

’इलेट डेट’ चे संस्थापक संजय पंचाळ यांच्यानुसार, ही चांगली बाब ठरत आहे की, जेव्हा तुम्ही सांगता की तुम्ही व्हॅक्सीन घेतली आहे. आमचा रिसर्च सांगतो की, 60 टक्केपेक्षा जास्त यूजर्स अशा लोकांसोबत डेटिंगमध्ये रूची दाखवत नाही जे लसीकरण विरोधात आहेत. अनेक अ‍ॅप व्हिडिओ कॉलसारखे फिचर्स सुद्धा यूजर्ससाठी घेऊन आले आहेत जेणेकरून लोक सुरक्षित डेटिंग करू शकतील.