वरकुटे बु. येथे ऊसतोड मजुरांकडुन प्राणघातक शस्त्रे जप्त, इंदापूर पोलीस पथकाची कारवाई

इंदापूर : वरकुटे बु (ता.इंदापुर) येथील आबा करे वस्ती येथे मागील दोन महिन्यापासुन वास्तव्यास असणारे व ऊसतोड मजुर म्हणुन काम करणार्‍या मजुरांकडे इंदापूर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात प्राणघातक शस्त्रांचा अवैध साठा सापडला आहे.तर पोलीसांनी चार जणाना अटक केली असुन त्यांना इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दीले असल्याची माहीती इंदापूर तपास अधिकारी दिपक पालखे यांनी दीली आहे.

गुरूवार दि.१७ डिसेंबर २०२० रोजी रात्री इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित जाधव यांचे पोलीस पथकाने इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील आबा करे वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या मौजे बांभुरे, ता.कर्जत,जि.अहमदनगर येथील
ऊसतोड मजुरांच्या वस्तीवर अचानक टाकलेल्या छाप्यात चार जणांकडे अंथुरणाखाली धारदार तलवार,जांबीया, धारदार २ कोयते अशा घातक शस्रांसह शक्ती ऊर्फ शक्तीमान उर्फ सकट्या उर्फ चिंटु विकास काळे, नितिन विकास काळे, जितेंद्र भारत चव्हाण, व अर्जुन विकास काळे सर्व रा. भांबुरे,ता.कर्जत,जि.अ.नगर या चार जणांना इंदापूर पोलीसांनी अटक केली असुन त्यांचे विरोधात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरील आरोपीपैकी शक्ती उर्फ शक्तिमान उर्फ सकट्या उर्फ चिंटु विकास काळे याचेवर इंदापूर पोलीस ठाण्यात दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी त्याचे स्वत:चे दोन वर्षीय चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल असुन सदर गून्ह्यात फरार आहे.तर नितिन विकास काळे हा याचेवर कर्जत पोलीस ठाण्यात गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे. सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूर पो.नि.नारायण सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.अजित जाधव, पो.ना. दिपक पालखे,पो.काँ.अमित चव्हाण,विनोद मोरे,प्रवाण शिंगाडे, विनोद काळे, जगदीश उर्फ मामा चौधर,गजेंद्र बिरलिंगे,विठ्ठल नलवडे,विक्रम जमादार, यांचे पथकाने केली असुन पुढील तपास दिपक पालखे व प्रमोद धंगेकर हे करत आहेत.