Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आणि आता तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकट शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर होत आहे. यापर्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील शालेय अभ्यासक्रमात (Academic Curriculum) 25 टक्के कपात (25 percent reduction) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही.
अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरु केलं आहे.
मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत.
त्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे शिक्षकांवरील ताण काही प्रमाणात हलका होणार आहे.
तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे.

शिक्षक संघटनांची मागणी

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (Maharashtra State Board) शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Web Title :- Varsha Gaikwad | 25 percent cut in curriculam for this year announces state government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या