Minister Varsha Gaikwad यांचे शिक्षणाधिकार्‍यांना आदेश, म्हणाल्या – ‘विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍याना शाळांची मान्यताच रद्द करा’

मुंबई (Mumbai ) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Minister Varsha Gaikwad |गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे (Corona) शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन (Online Educartion) पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. असे असतानाही काही खासगी शाळांनी पालकांकडे शालेय शुल्क भरण्यासंबधी तगादा लावला आहे. एवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशी पावल उचलणे म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा (Right to education act) भंग आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणा-या शाळांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी शिक्षणाधिका-यांना दिले आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करावी असे आदेशही शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.varsha gaikwad | action against school who restrict students to learn

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कोरोनामुळे अनेक पालकांची नोकरी (Job) गेली आहे, तर काहीचा व्यवसाय, धंदे ठप्प आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळांकडून फीसाठी सतत तगादा लावला जात आहे. फी न भरल्यास पाल्याला शाळेतून काढून टाकले जाईल, अशा धमक्या काही शाळा देत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून काही शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. इतकंच नाही तर काही कठोर शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या पत्यावर शाळा सोडल्याचा दाखला पाठवला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सगळ्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही शिक्षण संस्थाना आणि व्यवस्थापकांना विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. फी भरण्यासाठी दबाव आणणे आणि शाळेतून काढून टाकणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : varsha gaikwad | action against school who restrict students to learn

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर