Varsha Gaikwad On SSC Exam | ‘पेपरफुटीचं प्रकरण आढळल्यास थेट…’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – Varsha Gaikwad On SSC Exam | राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Maharashtra Board Exam) चालू आहेत. दोन वर्षांनी ऑफलाइन परीक्षा (Offline Exam) होत आहेत. कोरोनामुळे (Corona) यंदा शाळा तिथे केंद्र (Center) चालू केलं आहे. मात्र यामध्ये आता अनेक ठिकाणी परीक्षेत गैरप्रकार घडत आहेत. या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad On SSC Exam) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही शाळेमध्ये आता पेपरफुटीचं प्रकरण आढळल्यास तर त्या शाळेची मान्यता काढून घेण्यात येईल. जर कॉपीचं प्रकरण (Copy Case) सापडलं तर त्या शाळांना पुढे केंद्र दिलं जाणार नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच दहावीचे विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहेत त्यामुळे परीक्षेसंदर्भात अफवा (Rumors) कोणी पसरवू नये, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले pic.twitter.com/y2RS7P6P5j
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
यंदा शाळा तिथे केंद्र असल्याने दहावीची केंद्र मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
त्यामुळे जास्त पोलीस बंदोबस्ताची मागणी आम्ही केली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सभागृहात सांगितलं.
जिल्हाधिकारी (Collector) आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेत परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत
असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, दोन ते तीन दिवसांपुर्वी बारावीची रसायनशास्त्राचा (Chemistry) पेपर फुटल्याचं समोर आलं होतं.
खाजगी क्लास (Private Class) घेणारे शिक्षक ज्यादाची फी घेऊन बोर्डाच्या पेपरमधील (Board Paper)
परीक्षेआधीच देत असल्याचे अनेक आरोप काही पालकांनी केले होते.
Web Title :- Varsha Gaikwad On SSC Exam | varsha gaikwad on ssc exam recognition of school will be canceled in case of cheating in exam education minister varsha gaikwad announces
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Diabetes Diet | डायबिटीजच्या रुग्णांनी सेवन करावी ‘या’ पीठाची भाकरी, ब्लड शुगर राहील एकदम नियंत्रित