Varsha Gaikwad – TET Exam | ‘जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Varsha Gaikwad – TET Exam | राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच टीईटी परीक्षेतील (TET Exam) गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई (Strict action) करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा बातम्यानंतर ट्विट करत आपली भूमिका मांडली. यात त्यांनी शिक्षण विभागाच्या (Education Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याचंही नमूद केलं आहे. (Varsha Gaikwad – TET Exam)

 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, मी टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबतची बातमी पाहिली. यानंतर मी शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मला हे सांगायचं आहे की कुणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. यात कुणाचीही परवा केली जाणार नाही. तो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती
दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जी काही मदत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने लागेल ती मदत केली जाईल. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी (Additional Chief Secretary Vandana Krishnaji) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती (Committee) गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. याचा अहवाल काही दिवसांतच सादर केला जाईल. कायदेशीर प्रक्रियेत (legal process) आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच कुणाचीही हयगय केली जाणार नाही. ज्यांनी या गैरव्यवहारात सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title :- Varsha Gaikwad – TET Exam | maharashtra education minister varsha gaikwad on tet exam fraud allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cristiano Ronaldo Girlfriend List | अबब…! क्रिस्टियानो रोनाल्डोनं 13वर्षात केलं चक्क 18 गर्लफ्रेंडला डेट, यामध्ये होता ‘या’ भारतीय अभिनेत्रीचा समावेश

MLA Sunil Kamble | ‘सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम’ – आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन

Jalgaon Bhusaval News | भुसावळमध्ये भाजपच्या तब्बल 30 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (व्हिडीओ)

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!