‘या’ बॉलिवूडच्या हिट सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार वरुण धवन आणि सारा अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैफ अली खानची लेक बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान खूपच कमी काळात प्रकाशझोतात आली आहे. बॉलिवूड मध्ये साराचे वेगळे स्थान तिने बनवले आहे. आतापर्यंत साराने केवळ दोन सिनेमांत काम केले आहे. तिने केलेला केदारनाथ आणि सिम्बा हे सिनेमे उत्तम आहेत.

आता माहिती मिळाली आहे की, सारा तिच्या आगामी सिनेमात वरुण धवनसोबत दिसणार आहे. बॉलिवूड मधील वृत्तांनुसार, हे दोघेही कुली नंबर वन या सिनेमाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. डेविड धवन आणि वासू भगनानी तब्बल 25 वर्षांनंतर सदाबहार कॉमेडी सिनेमा कुली नंबर वनच्या रिमेक साठी एकत्र येत आहेत. या सिनेमात सारा आणि वरुण प्रमुख भूमिकेत असणार आहेत. या सिनेमाची शुटींग ऑगस्ट 2019 मध्ये सुरु होणार आहे.

नुकताच वरुण धवन कलंक या सिनेमात दिसला होता. कुली नंबर वन या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा सिनेमा 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात करिश्मा कपूर आणि गोविंदा प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता या सिनेमात वरुण धवन त्यांच्या अंदाजात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी वरुण धवन जुडवा या सलमानच्या गाजलेल्या सिनेमाच्या सेकंड पार्टमध्येही दिसला होता. दरम्यान आता कुली नंबर वनच्या रिमेकमध्ये आधीच्या सिनेमातील दो गाणी ही तशीच दिसणार आहेत असे समजत आहे. हुस्न है सुहाना आणि मै तो रस्ते से जा रहा था ही ती गाणी आहेत.

Loading...
You might also like