वरुणने आलियाला अशी मिठी मारली की त्यालाही वाटली लाज, व्हिडीओ झाला लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यात वरूण आलियाला मागून मिठी मारत आहे. परंतु यावेळी वरुणलाही थोडी लाज वाटल्याचे दिसत आहे.

सध्या वरूण आणि आलिया हे त्यांच्या आगामी चित्रपट कलंकच्या प्रमोशनसामध्ये व्सस्त आहेत. अशातच दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की वरूण  आलियाला मागून हग करत आहे फोटो शुट सुरू आहे. परंतु वरुण यात थोडा लाजताना दिसत आहे. तसे तर ते दोघेही चांगले मित्र आहेत. त्यामळे दोघेही एकमेकांसोबत कम्फर्टेबल दिसत आहे.

वरुण आणि आलियाने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे. हम्टी शर्मा की दुल्हनियां, बद्रीनाथ की दुल्हनियां, स्टुडंट ऑफ द इयर अशा अनेक हिट चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. लोकांनी त्यांच्या जोडीला पसंतीही दिली आहे.