‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड स्टार बालमैत्रिणीसोबत करणार लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार वरुण धवन त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सर थ्रीडी मुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी त्याचा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या वरूण त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लवकरच वरूण त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. एका रिपोर्टनुसार, मे मध्ये हे लग्न पार पडणार असून हे एक ग्रँड लग्न असणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या लग्नात मेहंदी, संगीत, रिसेप्शन असा सगळ्याचा समावेश असणार आहे.

वरुण आणि नताशाच्या या लग्नाला सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि सलमान खान यांसारखे कलाकार येण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या लग्नाची डेट सिक्रेट ठेवण्यात आली आहे. हे लग्न गोव्यातील बीच रिसोर्टला होणार असल्याचं समजत आहे. काही कलाकारांना त्यांच्या तारखा रिझर्व करण्यासाठी सांगण्यात आल्याचंही समजत आहे.

View this post on Instagram

Tu lagdi…. @shraddhakapoor out tomorrow

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमा वरूण, श्रद्धा आणि नोरा फतेही यांच्या व्यतिरीक्त शक्ती मोहन ही देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी सोबतच हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे.

रेमो डिसूजानं डायरेक्ट केलेला स्ट्रीट डान्सर 3 डी हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज केला जाणार आहे. 2013 साली आलेल्या एबीसीडी या सिनेमाचा हा तिसरा पार्ट आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like