Post_Banner_Top

दिपीका-प्रियंकानंतर ‘हा’ अभिनेता लग्नासाठी करणार लाखोंचा खर्च

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड मध्ये लग्नाचा माहोल पुन्हा चालू झाला आहे दीपिका-रणवीर आणि प्रियंका नंतर आता वरुन धवन लग्न करणार आहे. वरुन धवन खुप दिवसांपासून गर्लफ्रेंड नताशासोबत रिलेशनशिप मध्ये आहे. आता असे कळून आले आहे की ते दोघे लग्नासाठी जास्त दिवस थांबणार नाहीत.

एका मनोरंजन वेबसाइटच्या मते, वरुन धवन डिस्टेशन वेडिंग करणार आहे. रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार त्या दोघांनी गोवा मध्ये आपले लग्न करण्याचे ठरवले आहे. वरुन यावर्षी डिसेंबर मध्ये लग्न करणार आहे व त्यानंतर मुंबई मध्ये रिसेप्शन पार्टीच नियोजन केले आहे. ज्यामध्ये बॉलीवूड मधील आणि आणखी दुसऱ्या क्षेत्रातील दिग्गज येतील.

रिपोर्टनुसार , विवाह शाही बनविण्याकरिता डेव्हिड धवन काहीच मागे सोडत नाही आणि सर्व तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. वरुण आणि नताशा जवळचे नातेवाईक, मित्र आणि बॉलीवूड मधील लोक सहभागी होतील. नताशा आणि वरुण दोघेही लहानपणाचे मित्र आहेत त्यानंतर ते दोघं एका दोघे एका संगीत मैफिलीत भेटले, जिथे ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

नताशाबरोबर राहण्यासाठी वरुण यांनी स्वतंत्रपणे घर खरेदी केले होते,असेही सांगितले होते.नताशा दलाल फॅशन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एनवायसीचे पदवीधर झाली आहे. नटशा वरुणच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग बनली आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायच गेल तर वरुण धवनचा नुकताच कलंक चित्रपट रेलीज झाला आहे . बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप गेला आहे . त्यानंतर, श्रद्धा कपूरबरोबर स्ट्रीट डान्समध्ये तो दिसेल . हा चित्रपट रेमो डिसोझा यांनी दिग्दर्शित केला आहे.

Loading...
You might also like