अभिनेता ‘वरूण-श्रद्धा’च्या ‘स्ट्रीट डान्सर 3D’ चा ट्रेलर रिलीज ! जबरदस्त अ‍ॅक्शन अन् सेक्सी डान्स मुव्स (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टार स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रेमो डिसूजानं डायरेक्ट केलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूपच आवडला आहे. काही तासांतच ट्रेलरला 25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हजारो लोकांनी ट्रेलर लाईक केला आहे. सोशलवरही ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ट्रेलरमध्ये दिसत आहे की, वरुण-श्रद्धा एक से बढकर एक डान्स मुव्स करताना दिसत आहेत. वरुण आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. प्रभू देवादेखील या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री नोरा फतेहीची देखील ट्रेलरमध्ये झलक पाहायला मिळत आहे. नोरा सेक्सी मुव्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6M2OcVhsJo/?utm_source=ig_embed

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमा वरूण, श्रद्धा आणि नोरा फतेही यांच्या व्यतिरीक्त शक्ती मोहन ही देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा एकदमच अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी सोबतच हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे.

स्ट्रीट डान्सर 3 डी हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज केला जाणार आहे. 2013 साली आलेल्या एबीसीडी या सिनेमाचा हा तिसरा पार्ट आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/