वरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते ! म्हणाले -‘मंगळसुत्र कुठंय अन् बांगड्या पांढऱ्या का ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी (वार- रविवार) दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील द मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. कपलचे अनके फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नातील नताशाचा लुक चाहत्यांना आवडला नाही असं दिसत आहे. कारण अनेकांनी लुकवरून कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.

वरुण आणि नताशा यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कमेंट करत टीका केली आहे. लग्नाच्या दिवशीच नताशानं पांढऱ्या रंगाला पसंती दिली हे काहींना आवडलं नाही. फक्त ड्रेसच नाही तर बांगड्याही पांढऱ्या घालणं यावरून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. नताशानं मंगळसूत्र का घातलं नाही आणि सिंदूर का लावला नाही असा सवालही अनेकांनी केला आहे.

एका चाहत्यानं कमेंट केली की, असं दिसतं की, दोघं कुणाच्या तरी लग्नला जात आहेत. त्यांचं लग्न झालंय असं अजिबातच वाटत नाही. एकानं असंही लिहिलं की, या लुकमध्ये नताशा नवरीप्रमाणे दिसत नाही. कित्येकांना तर तिचे दागिने आणि कपडे आवडले नाहीत.

असेही काही चाहते होते ज्यांना तर नताशा ही वरुणपेक्षा मोठी आहे असं वाटलं. काहींनी मात्र कपलचं आणि नताशाचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर ट्रोल करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावलं आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे.