वरूण धवननं खास अंदाजात केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत, शेअर केला ‘फनी’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आजच (सोमवार दि 24 फेब्रुवारी 2020) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी भारतात आले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इवांका ट्रम्प सोबतच त्यांचा जावईदेखील आहे. आज त्यांनी अमहमदाबादला भेट दिली. यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले होते. अशातच बॉलिवूड स्टार वरून धवणनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की वरुण धवन डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बोलत आहे. ट्रम्प यांचं स्वागत करण्याबद्दलही तो भाष्य करताना दिसत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत तो अनेक कॉमेडी डायलॉग बोलताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

वरुणनं उत्साहाच्या भरात हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला खरा परंतु नंतर मात्र त्यानं हा व्हिडीओ इंस्टावरून डिलीट केला आहे. परंतु वरुणच्या नावानं असणाऱ्या एका इंस्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे जो चाहत्यांच्या नजरेतून काही सुटला नाही.