सुशांत सिंह केस मध्ये वरुण धवननं केली CBI चौकशीची मागणी, युजर्स म्हणाले – ’60 दिवसांनी जाग आली ?’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :सुशांतसिंह राजपूत केस मध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता वरूण धवनने देखील सुशांतसिंह केसमध्ये सीबीआय चौकशीसाठी आपले समर्थन दाखवले आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकून सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे देण्याला समर्थन दिलं आहे. पण त्याची ही पोस्ट लोकांना आवडलेली दिसत नाही. युजर्सनी उलट तो आपल्या आगामी सिनेमासाठी खोटी सहानुभूती दाखवत आहे असं म्हणत ट्रोल केलं.


युजर्स म्हणाले, आलिया भट्टचा आगामी सिनेमा सडक 2 च्या ट्रेलरला लोकांची नापसंती मिळत आहे म्हणून वरूण घाबरला आहे. आणि त्याचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 वर अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून तो सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशा मागणीचा दिखावा करत आहे.

एका यूजरने लिहिलंय, ‘भाई खूप लवकर आला, सडक 2 चे हाल पाहून घाबरला, ही तर सुरुवात आहे बॉलीवूडची तर आता लंका होईल.’ तर अजून एकाने लिहिलंय- ‘शेम ऑन यू वरुण धवन, जेव्हा सडक 2 च्या ट्रेलरला नापसंती मिळाली तेव्हा आला.’

एकाने लिहिलं- ‘कीर्ती सेननचं समजू शकतो तिच्यावर प्रेशर असेल पण वरूण धवन आणि सुरज पांचोली नाटक करत आहेत, त्यांच्यावर कोणता दबाव होता जे आधी काही बोलले नाहीत आणि आता बोलत आहेत. आम्हाला वेडे समजतात. सडक 2 ची परिस्थिती बघून असं केलं असेल. #CBIForSSR.’

अजून एका यूजर ने लिहिलं आहे- ‘ जेव्हा जास्त गरज होती तेव्हा तुम्ही कुठं होता, आम्ही भीक मागत होतो आवाज उठवा म्हणून आणि आता खोटी सहानुभूती नको. लोकानी योग्य वेळी आमची साथ दिली आहे.

एक यूजर लिहितो, सडक 2 ची परिस्थिती बघून घाबरला, 60 दिवसांनी आता जाग आली. यांना वाटतं की लोक वेडे आहेत आणि यांच्या जाळ्यात फसतील. अशा प्रकारे अनेक लोकांनी वरुण धवनला ट्रोल केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like