Mr Lele first look : दिग्दर्शक शशांकसोबत वरुणच्या 3 ऱ्या चित्रपटाची घोषणा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – वरुण धवन आणि दिग्दर्शक शशांक खेतान या जोडीने आपल्या सर्वांना ‘हम्पी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सारखे मजेदार चित्रपट दिले आहेत आणि आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात काम करणार आहेत. करण जोहर निर्मित चित्रपट ‘मिस्टर लेले’ यामध्ये वरुण धवन काम करत आहेत. शशांक खेतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

करण जोहर आणि वरुण धवनने ‘मिस्टर लेले’ यांचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये वरुण एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की, वरुण धवन आणि शशांक खेतानची ड्रीम टीम एकत्र धमाल करणार असून हा चित्रपट मनोरंजनने भरला असणार आहे. ‘मिस्टर लेले’ हा चित्रपट 1 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होईल.

काही काळापूर्वी या चित्रपटाच्या हिरोईनविषयी बर्‍याच चर्चा रंगल्या होत्या. कियारा अडवाणी वरुणसोबत काम करणार असल्याचे समजले होते पण नंतर, व्यस्त शेड्यूलमुळे कियाराने हा चित्रपट सोडल्याचे कळाले.

या चित्रपटात वरुण धवन आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांसोबत जाह्नवी कपूरसुद्धा या चित्रपटात असू शकते. जर तसे झाले तर जाह्नवी कपूर आणि शशांक खेतानचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी या दोघांनी ‘धडक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

वरुण धवन सध्या आपला चित्रपट ‘स्ट्रीट डान्सर 3 D’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नोरा फतेही आणि श्रद्धा कपूर दिसणार आहे. हा चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय वरुण, सारा अली खान हिच्यासोबत ‘कुली नंबर’या चित्रपटात काम करणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/