Coronavirus : ‘या’ आघाडीच्या अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्याला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. त्यामुळे विविध देशातील संकट काही केल्या कमी होत नाही. आतापर्यंत 90 पेक्षा अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यात भारताचाही समावेश आहे. अनेक सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत बर्‍याच जणांना याची लागण झाली आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवनच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

लॉकडाउनमुळे चित्रपट, मालिका, वेबसीरिज, नाटकासह चित्रीकरण बंद असल्यामुळे सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यामध्येच वरुणने अलिकडेच एका इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने त्याच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. जगात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच माझ्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

माझ्या कुटुंबातील काही जण अमेरिकेत राहतात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जोपर्यंत तुमच्या जवळच्या व्यक्तीवर एखादे संकट कोसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या परिस्थितीची जाणीव नसते. त्यामुळे हा विषाणू प्राणघातक आहे हे लोक समजून घेत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो कृपा करुन घरात रहा, सुरक्षित रहा, असे वरूणने सांगितले आहे. मैत्रीण आणि अभिनेत्री जोओ हिची तब्येत खराब झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिला दुसर्‍या दिवशी खोकला झाला आणि श्वास घेण्यास अडथळा आल्यानंतर तिला कोरोनाचे निदान झाले होते.