‘हाच तोच व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे मी कोरोनावर मात केली’, वरुण धवनने शेअर केला मलायकाचा Video

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत अनेकजण संक्रमीत होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडमधील अनेकजण कोरोना बाधित झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा देखील काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित झाला होता. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरुन दिली होती. आता वरुण धवन कोरोना मुक्त झाला आहे. मात्र, कोरोनावर आपण कशी मात केली याची माहिती त्याने सांगितली आहे. त्याने एका श्वसनासंबंधी व्यायाम प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच व्यायाम प्रकारामुळे आपण कोरोनावर मात केल्याचे त्याने सांगितले आहे.

वरुण धवनने याने फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोराचा ब्रिथिंग एक्सरसाईज करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना वरुण धवन याने म्हटले, हा तोच व्यायाम प्रकार आहे जो मी कोरोना संक्रमित असताना नियमित करत होता. हा खूपच उपयोगी आहे. असे वरुण धवनने सांगितले आहे. वरुणने गुरुवारी हा व्हिडीओ शेअर केला असून याला हजारो जणांनी लाईक केले आहे तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

बॉलिवूड अॅक्टर वरुण धवन हा मागील वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना बाधित झाला होता. त्यावेळी तो चंदीगडमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’चं शुटींग करत होता. वरुण धवन याने कमी वेळेत कोरोनावर मात केली होती. तसेच याचा फायदा इतरांना व्हावा यासाठी त्याने मलाइकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय वरुणचा लवकरच वाढदिवस आहे. त्यासाठी चाहत्यांनी त्याला वृक्षारोपण करुन वाढदिवसाची भेट दिल्याची माहिती वरुणने सोशल मीडियावर दिली आहे.