Varun Sardesai | कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती, वरुण सरदेसाई यांचं मोठं विधान; कोणत्या पक्षाला पडणार खिंडार?

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या काळात जशी कोरोनाची लाट ओसरताना दिसेल तशी शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल. शिवसेनेमध्ये इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी भरती होणार असल्याचं मोठं विधान युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताच शिवसेनेत (Shiv Sena) मेगा भरती (Mega Bharti) होताना दिसेल, असा दावा युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला आहे.

वरुण सरदेसाई (Varun Sardesai) म्हणाले की, ‘अन्य पक्षातील अनेक चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक आहेत. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी तसेच संपर्क प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर आगामी काळात जशी कोरोनाची लाट ओसरताना दिसेल तशी शिवसेनेत मेगा भरती होताना दिसणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील चांगल्या कार्यकर्त्याना शिवसेनेत यायचे आहे असं भाष्य सरदेसाई यांनी केलं आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुढे बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास अनेक पक्षातील नेते, कार्यकर्ते उत्साही आहेत.
चांगले कार्यकर्ते, चांगल्या नेत्यांना प्रवेश देऊन संधी देण्यात येईल, याबाबत निर्णय शिवसेनचे नेते घेतील.
तर, आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) शिवसेनेत आले आहेत.
त्यांच्यासोबतच चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
युवा सेनेचे पदाधिकरी असले तरी निष्ठावान कार्यकर्ते असतात.
चांगले काम करत असेल तर कार्यकर्त्यांची दखल घेत योग्य उमेदवारी देतील असं देखील ते म्हणाले.
या दरम्यान, वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या दाव्यामुळे आता कुठल्या पक्षाला गळती लागणार आणि कोणत्या पक्षातील नेते,
पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी इच्छूक आहेत यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

Web Title :- Varun Sardesai | mega bharti in shiv sena as soon as the wave of corona decreased said yuva sea secretary varun sardesai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे