नीतेश राणेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले – ‘वाझे प्रकरणात वरुण सरदेसाईची भूमिका, ते फोन रेकॉर्डिंग तपासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी घणाघाती आरोप केले आहेत. वाझे प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदसाई यांची भूमिका आहे. त्यामुळे सरदेसाई यांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कदायक आरोप केले आहेत. एक साधा एपीआय इतक मोठं पाऊल उचलतो. त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उतरतात, शिवसेना नेते त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे येतात ते का? असा प्रश्न पडतो. त्याची काही कारण माझ्याकडे असल्याचा दावाही राणे यांनी केला आहे. गेल्या वर्षी आयपीएल मालिका झाली. या आयपीएलचा या केसशी काय संबंध आहे, ते मी सांगणार आहे. मुंबईत अनधिकृतपणे बेटिंग करतात. या लोकांना वाझेचा फोन जातो. तुम्हाला अटक व्हायची नसेल तर मला 150 कोटी द्या अशी धमकी वाझेंनी या बेटिंगवाल्यांना दिली होती. यातील मूळ कलाका आणखी एकजण आहे. वाझेला एक फोन आला आणि आपला हिस्सा मागितला गेला. हा फोन वरून सरदेसाई यांचा होता असा आरोप करत राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. या संभाषणाचा मागोवा NIA ने घ्यावा. तसेच सगळ्यांची तपासणी करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.