Varun Singh Passed Away | हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Varun Singh Passed Away | तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे MI-71V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन (Varun Singh Passed Away) झाले आहे.

 

या दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Air Force Group Captain Varun Singh) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची 168 तासांची झुंज अपयशी ठरली

एक वर्षापूर्वी वरुण सिंह उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीमध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्ट वरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्र (Shaurya Chakra) प्रदान करण्यात आले होते.

Web Title :- Varun Singh Passed Away | iaf chopper crash group captain varun singh passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supreme Court On OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्ट म्हणाले – ‘आमच्यासमोर ‘हे’ दोनच पर्याय…’

Surveen Chawla | कास्टिंग काउचवर सुरवीन चावलाचे दुःख अनावर, म्हणाली – ‘लोक तुमच्या कमरेची साईज…’

Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले – ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील’