काय सांगता ! होय, पोलिसच बनला चोर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  साधारणपणे चोराने चोरी केल्यानंतर त्याला पोलीस पकडत असतात. मात्र वसईत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने कोट्यवधी रुपयांच्या जप्त केलेल्या मालावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला या प्रकरणात अटक केली आहे. 
काय आहे प्रकरण

वालिव पोलिसांनी 2018 मध्ये एका विदेशी कंपनीच्या सिगरेटची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास 2 कोटी 16 लाख रूपये किमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या होत्या. त्यानंतर हा माल पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता. या कॉन्स्टेबलवर या गोण्यांमधील 100 गोण्या माल चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मालावर नजर ठेवणाऱ्या व्यक्तींशी संगनमत करून या कॉन्स्टेबलने हा माल चोरी केल्याचे उघड झाले आहे. सहाय्यक फौजदार शरीफ रमझान शेख असे या आरोपीचे नाव आहे.

जप्त केलेल्या मालाबरोबर जप्त केलेला आपला टेम्पो पुन्हा मिळावा यासाठी मालकाने न्यायालयात दावा केला होता. त्यानंतर कोर्टाने पोलिसाना तो टेम्पो परत देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी हा टेंपो परत देताना त्यातील माल उतरवला असता त्यामध्ये 150 ऐवजी पोलिसांना यामध्ये केवळ 50 गोणीच आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता हा पोलीस अधिकारी यामध्ये दोषी आढळून आला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 409 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर देखील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता असल्याने पोलीस आणखी तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –