Advt.

Vasai ShivSena | वसईमध्ये शिवसेनेच्या तब्बल 150 पदाधिकार्‍यांचा राजीनामा, जाणून घ्या प्रकरण

मुंबई विरार : पोलीसनामा ऑनलाइन –  Vasai ShivSena | राज्यात राजकीय पक्षांच्या घडामोडीत अनेक खळबळ उडाल्याची माहिती समोर येत असते. नाराज झालेले नेते, पदाधिकारी थेट आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुस-या पक्षाशी लागेबांधे करताना दिसत आहे. या दरम्यान आज वसई तालुक्यात शिवसेना (Vasai ShivSena) पक्षात मोठी खळबळ झाल्याचं दिसत आहे. वसईच्या पूर्वपट्टीतील तब्बल 150 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे (Resigned) दिल्याने राजकीय वातावरणात जोरदार चर्चा होत आहे. याावरुन शिवसेनेला एक धक्काच असल्याचं समजतं.

 

पक्षाच्या आढावा बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून लांब ठेवले जात असून इतर पक्षातून आलेल्याना जवळ केले जात असल्याचे कारण देत वसई पूर्वेमधील गोखिवरे, सातिवली, वालिव, गावराईपाडा,
संतोष भुवन या 5 विभागातील सेनेच्या (Vasai ShivSena) 150 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रवीन्द्र फाटक (Rabindra Phatak)
आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांच्याकडे दिले आहेत. यांच्याकडे दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

तर, सामूहिक राजीनामा दिलेल्यामध्ये बोईसर विधानसभा समन्वयक अजित भोईर, उप तालुका प्रमुख काकासाहेब मोटे , विभाग प्रमुख शरद गावकर,
युवा सेनेचे धनंजय मोहिते यांच्यासह शिवसेनेच्या पडत्या काळात ही सेना वाढविण्यासाठी आणि ती टिकविण्याचे काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पूर्वपट्टीत चर्चेला वेग आला आहे.

 

शिवसेनेत कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात असून दुसऱ्या पक्षातून आलेल्याना पायघडया घातल्या जात आहेत, असा आरोप शिवसैनिकांकडून केला जातो आहे.
त्याचबरोबर आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्हाला पदापेक्षा ओळख आहे ती शिवसैनिक म्हणून. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत.
शिवसैनिक म्हणून आम्ही कायम आहोत. सत्ता आल्यावर पक्षासाठी खस्ता खालेल्याला शिवसैनिकांना लांब केले जात आहे.
तर इतर पक्षातून आलेल्याना मात्र पायघड्या घातल्या जात आहेत. अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर (Nilesh Tendulkar) म्हणाले की, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे हे गैरसमजातून दिले आहेत.
हे एका घरातील गैरसमज आहेत ते मिटविण्यात येणार असून , पुन्हा एकदा त्या ठिकाणी सेना जोमाने काम करतील, असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

 

Web Title : Vasai ShivSena | Big blow to shivsena in vasai 150 shivsainik resign from post know the matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Atmanirbhar Bharat Abhiyan | देशाच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट ! 7 मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेची अधिसूचना जारी

Mumbai Pune Expressway Accident | ‘तो’ अपघात नव्हे ! 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? पोलीस तपासातुन ‘पर्दाफाश’

Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’