वसई-विरार ! आमदार पत्नीचं होळीचं गाणं ‘सोशल’वर चालतंय जबरदस्त (Video)

विरार : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायन क्षेत्रात नशीब आजमावताना पाहिले आहे. पण आता वसई विरार महापालिकेच्या माजी महापौर आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्नी प्रविणा ठाकूर याही गायनात रममाण होताना दिसत आहेत. त्यांनी होळीच्या पूर्वसंध्येला गायलेलं राधा-कृष्ण-मीरा यांचे होली खेलन पधारो नंदलाला हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाण त्यांनी स्वतः लिहल असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

प्रविणा ठाकूर या बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांच्या पत्नी आहेत. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत एकाहाती सत्ता खेचून आणल्यानंतर त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. विशेष म्हणजे 2019 साली भाजपाची लाट असूनही पालघर भागात बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आले आहेत.