वसई-विरार महापालिकेतील सहाय्यक आयुक्त बेपत्ता; प्रचंड खळबळ अन् उलट-चर्चा सुरु

वसई-विरार : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 2 दिवसांपासून वसई- विरार (Virar) महापालिकेचे (Vasai Virar Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव (Premsingh Jadhav ) बेपत्ता (missing) आहेत. यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरार (Virar) पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे. एका वृत्तानुसार, 2 जून रोजी जाधव आपल कार्यालयीन कामकाज संपवून घराकडे निघाले होते. पण ते घरी पोहोचलेच नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याने शहरात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

गेल्या दीड वर्षापासून जाधव यांच्याकडे कोरोना लढ्यातील महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पण मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आपल्या पदावर रुजू झाल्यापासून जाधव यांनी शहरात अनेक महत्त्वाची काम केली आहेत. सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना, त्यांनी शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा राग असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी विरार पोलीस ठाण्यात जाधव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वेगाने तपास सुरु केला आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत