Vasai Virar News | वसईत 2 हजारच्या नोटांचा पाऊस…अन् गर्दीचा महापूर

वसई : पोलीसनामा ऑनलाइन टीम Vasai Virar News | महागाईने सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्यातच जर १० , ५०, १०० अन् पाचशेच नाही तर चक्क दोन हजार नोटांचा पाऊस झाला तर अशी कल्पना जरी केली तरी आपल्या डोळ्र्यासमाेर किती मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचे चित्र दिसायला लागेल. पण वसईमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. येथील मधुबन परिसरात रस्त्यावर चक्कम दोन हजारांच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. हे लक्षात येताच नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली मात्र, नोटा उचलून पाहिल्यानंतर त्या खोट्या असल्याचे निदर्शनास येताच सगळ्यांचाच हिरमोड (Vasai Virar News) झाला.

वसईच्या रस्त्यावर या नोटा आल्या कोठुन असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याची कोणालाही माहिती नव्हती. प्रत्येक जण या नोटा कोठून आल्या याचा शोध घेऊ लागला त्याचवेळी एका वेब सिरिजच्या चित्रीकरणात या नोटा वापरल्याचे समोर आल. सन्नी नावच्या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरु असून त्यामध्ये २ हजार रुपयांच्या खोट्या नोटा रस्त्यावर टाकण्यात आल्या होत्या. चित्रीकरण पूर्ण झाले. पण त्या नोटा तशाच तेथे ठेवल्या गेल्या. त्यामुळे सकाळी ज्यावेळी लहान मुले आणि नागरिकांनी या नोटा पाहिल्या त्यावेळी त्या गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. या घटनेमुळे वसई, नालासोपारा (nalasopara) परिसरात वसईच्या मधुबन येथे ((Vasai Virar News) नोटांचा पाऊस पडल्याची अफवा पसरली होती. नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमलेला जमाव पांगवत वाहतूककोंडी दूर केली.

 

Web Title : Vasai Virar News | 2 thousand rupee notes vasai road citizens rush collect

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा; समोर आली धक्कादायक माहिती

Mahila Bal Vikas | महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी भरती, जाणून घ्या

Pune School Reopen | राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदूषकांसह ‘प्रवेश उत्सव’ साजरा