Vasant More On Dr Ajay Taware | डॉ. अजय तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावीत; 24 तास संरक्षण देण्याचे वसंत मोरेंचे आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vasant More On Dr Ajay Taware | कल्याणीनगर अपघात प्रकरणाबाबत (Kalyani Nagar Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी (Pune CP) फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामध्ये बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास त्याला आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Pune Porsche Car Accident)

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.(Vasant More On Dr Ajay Taware)

दरम्यान पोलीस तपासात डॉ. अजय तावरे यांनी मी सर्वांची नावे घेणार कोणालाही सोडणार नाही असे वक्तव्य केले होते.
अशावेळी एक साक्षीदार म्हणून त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या जीवाला धोका निर्माण
का होणार नाही अशी भीती व्यक्त करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती.

यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनी एक्स वर प्रसंगी सुरक्षा देण्याचे म्हंटले आहे.
हिम्मत असेल तर डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावीत. गरज पडल्यास वंचित बहुजन आघाडी
(Vanchit Bahujan Aghadi) म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही २४ तास संरक्षण देऊ असे म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dwarka Doke | एव्हरेस्टवर महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा; द्वारका डोके यांनी सर केले एव्हरेस्ट शिखर

Supriya Sule On Devendra Fadnavis | पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित; सुप्रिया सुळेंची टीका