Vasant More On Pune Lok Sabha | ‘दोस्ती मध्ये कुस्ती झाली तरी ती नूरा होणार नाही, चितपट मारणार’ – वसंत मोरे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vasant More On Pune Lok Sabha | पुण्यात लोकसभेसाठी भाजपाकडून (BJP) माजी महापौर मुरलीधर मोहळ (Muralidhar Mohol) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर मनसेतून (MNS) बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारीसाठी प्रयत्न केला, पण आता मोरे यांनी अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत.(Vasant More On Pune Lok Sabha)

वसंत मोरे म्हणाले, मनसे सोडून मला दहा दिवस झाले. मी आजपर्यंत राज ठाकरे व अमित ठाकरे यांना कधीच डिवचले नाही व आयुष्यात असे कधीही करणारही नाही. मी एकला चलो रे च्या भूमिकेत असून त्यावर ठाम आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही.

मोरे म्हणाले, भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे.
एवढे होऊनही लोकसभा निवडणुक एकतर्फी होणार अशी वल्गना केली जात असेल तर, जोपर्यंत वसंत मोरे पुणे
शहरामध्ये आहे तोपर्यंत ही निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही.

ते पुढे म्हणाले, मी मनसेतून बाहेर पडलो ते कुठल्या पक्षात जाण्यासाठी नाही.
मुळातच मी लोकसभा निवडणुक लढविण्यावर १०० टक्के ठाम आहे.
मध्यंतरीच्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

यात पुणे शहरात लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन कशाप्रकारे मोट बांधता येईल यावर चर्चा केली होती.
अजून निवडणुकीची रंगत येण्यास वेळ आहे. पण ही निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही, असा पुरूच्चार मोरे यांनी केला.

मोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून पाईपलाईनमध्ये होतो.
सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता पुढे जात असताना नक्की माशी कुठे शिंकली, किती जण आडवे आले, या वाटेमध्ये
कोणी कोणी काटे टाकले या सर्व गोष्टी मी पुराव्यानिशी सार्वजिक व्यासपीठावरून सांगणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश; आचारसंहिता भंग झाल्याचे आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत

Pune Hadapsar Crime | पुणे : डोळा मारून फ्लाईंग किस, जाब विचारताच महिलेच्या पतीला मारहाण