Vasant More | ‘लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून लढाई हरत नाही’ – वसंत मोरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ईदनंतर (Ramadan Eid 2022) आपल्या समर्थकांसह देशभरातील हिंदूंना एक आवाहन केलं. ज्या ठिकाणी अजान सुरू होईल त्या ठिकाणी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) डबल आवाजात वाजवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आवाहनानंतर ठिक – ठिकाणी हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मनसेच्या या आंदोलनामध्ये मनसेचे माजी पुणे (Pune) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) हे कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र अशातच यावर वसंत मोरे यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

एखाद्या लढाईला एखादा सैनिक नसला म्हणजे कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच राहणार असल्याचं वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटलं आहे.

 

ठाण्याच्या (Thane) सभेमध्ये राज ठाकरे यांनी मला मुंबईला (Mumbai) बोलावलं होतं.
माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता मात्र मी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत घरचा कार्यक्रम रद्द केला होता.
मी घरच्यांना समजावलं, जर गेलो नाहीतर पक्षामध्ये संभ्रम होईल त्यामुळे कार्यक्रम टाळू शकत नाहीत, असं वसंत मोरे म्हणाले.

 

दरम्यान, आमच्या भागात कोणत्याही प्रकारची आरती झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अजानचा आवाज बंद केला.
सकाळची अजान अंतर्गत होते. मी केलेल्या आवाहनाला त्यांनी साथ दिल्याचं मोरे यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Vasant More | pune mns leader vasant more speaks why he was not available tirupati balaji hanuman chalisa loudspeaker row

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा