Vasant More | शहराध्यक्षपद काढून घेतल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या मुंबईतील भाषणानंतर पुणे मनसेचे (Pune MNS) माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी ज्या भागात 15 वर्षापासून लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम (Muslim) बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ते लोक आमच्याकडे संशयाने पाहायला लागले आहेत. त्यामुळे मन व्यथित झालेच्या मनसे नेते मोरे यांनी म्हटले होते. मोरे यांच्याकडील शहराध्यक्षपद काढून साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन (City President) दूर केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी NCP), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), युवा सेनेचे वरुण सरदेसाई (Yuva Sena Varun Sardesai) अशांकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. मात्र मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नसल्याचे मोरे यांनी सांगितले होते. तसेच राज ठाकरे यांच्यावर अजूनही निष्ठा असल्याचे त्यांनी म्हटले होते. (Vasant More)

 

पुणे पोलिसांची नोटीस

दरम्यान, आता भारती विद्यापीठ पोलिसांकडून (Bharati Vidyapeeth Police Station) वसंत मोरे यांना कारवाईची नोटीस (Notice) पाठवली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

 

पोलिसांच्या नोटीस मधील मजकूर

वसंत कृष्णाजी मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहर
आपणास या नोटीसद्वारे कळवण्यात येते की, दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गुढीपडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठेकरेंनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे जर काढले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मशिदीसमोर हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करण्यात येईल असे वक्तव्य केले आहे.

 

आपण व आपल्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वरील वक्तव्याने अनुषंगाने
दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल
असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

Web Title :- Vasant More | pune police bharti vidyapeeth police give notice to vasant more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा