Vasant More | पुण्याच्या चांदणी चौक पुलाची राज्यात चर्चा, वसंत मोरे म्हणाले – ‘पुण्यात सत्ता येऊ देत…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | पुण्यातील चांदणी चौकातील पुल काल मध्यरात्री स्फोटकांच्या (Chandani Chowk Bridge Demolished) सहाय्याने पाडण्यात आला. हे कंत्राट घेतलेल्या कंपनीचा हा प्रयत्न फसला आणि पूल पूर्णपणे पडला नाही. दोन्ही बाजूला पूलाचे बांधकाम तसेच राहील. ’जेसीबी’ आणि ’पोकलेन’च्या साह्याने उर्वरित भाग पाडण्याचे आणि राडारोडा उचलण्याचे काम सुरू होते. यानंतर प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आणि सकाळी आकरा वाजेपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला. (Vasant More)

 

सहा सेकंदात पुल पाडण्याचा दावा प्रशासनाने केला होता. कंपनीचा दावा एकीकडे फोल ठरला असला तरी पुल किती मजबुत होता, याकडे काही लोकांनी लक्ष वेधले आहे. यामध्ये मनसेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

 

नोएडा येथील ’ट्विन टॉवर’ (Twin Towers) पाडणार्‍या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने महिनाभर पाडकामाची पूर्वतयारी केली. शनिवारी रात्री मध्यरात्री एक वाजता स्फोट घडवून पूल पाडला. 1350 डिटोनेटरच्या स्फोटानंतरही पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे एनएचएआय (NHAI) आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याची टीका सुरू झाली आहे. प्रशासनाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांच्या स्पष्टीकरणातही विसंगती आढळून येत आहे.

तर दुसरीकडे यावर आता मनसे नेते तथा पुण्याचे नगरसेवक वसंत तात्या मोरे (Vasant More)
यांनी पुलाच्या कंत्राटदाराचे कौतुक करत त्याला शाबासकी देणारे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
वसंत मोरे म्हणाले, 600 किलो स्फोटके, 1350 होल आणि पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी.
गेल्या महिण्यापासून धावपळ. केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक,
कार्यकर्ते यांची रेलचेल… प्रचंड मोठी यंत्रणा… तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत…
यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल.
भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी.
रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेल.

 

Web Title :- Vasant More | vasant more comment on chandni chowk bridge demolition pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

‘KRK नं केला धक्कादायक दावा; म्हणाला – ‘जे सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं, तेच आता माझ्यासोबत….’

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क