Vasant More | कोअर कमिटीच्या बैठकीतून वसंत मोरेंना डावललं, ‘तात्या’ म्हणाले –

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे सलग दोन दौरे झाल्यानंतर देखील पुणे मनसेमधील (Pune MNS) गटबाजी थांबताना दिसत नाही. पण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून पुन्हे एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन वसंत मोरे (Vasant More) यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत थेट वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

 

मनसेच्या पुणे कार्यकारिणीच्या बैठीकीच्या (Executive Meeting) निमंत्रणावरुन या सगळ्या वादाला तोंड फुटले आहे. मनसेच्या कोअर कमिटीकडून (MNS Core Committee) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोअर कमिटीमध्ये असलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना जाणीवपूर्वक यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर मोरे यांच्या नावाचा उल्लख नव्हता. पुणे मनसेच्या कोअर कमिटीमध्ये एकूण 11 सदस्य असून वसंत मोरे यांना वगळता उर्वरित 10 सदस्यांच्या नावासमोर विशिष्ट विषयाचा उल्लेख केला आहे. केवळ माझ्या नावाचा उल्लेख नसल्याचे मोरे यांनी आज (रविवार) पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

 

मनसैनिक माझ्या बाजूने

 

वसंत मोरे म्हणाले, मी एखाद्या बैठकीला गेलो नाही म्हणून लगेच माझे नाव वगळणे योग्य नाही. माझं असणं कोणाला खटकतंय, तेच कळत नाही, असे मोरे म्हणाले. परंतु मनसैनिक माझ्या बाजूने आहे, तात्या कसा आहे, हे त्यांना माहिती आहे. मी महन्याभरापूर्वी पक्षाचा शहराध्यक्ष होतो, आताही सरचिटणीस आहे, कोअर कमिटीमध्ये माझाही समावेश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनसेचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात हे पहावे लागेल.

 

मी पक्षातच आहे.

 

वसंत मोरे हे मागील काही दिवसांपासून पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात आणि बैठकांमध्ये दूर राहिल्याचे पहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरोधात (Azaan Loudspeakers) आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला (Agitation) उपस्थित न रहाता ते तिरुपतीला निघून गेले होते.
यावरुन पुण्यातील मनसेमध्ये धुसपुस सुरु झाली.
या प्रकारानंतर तुम्ही एकला चलो रे ची भूमिका घेतली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना ते म्हणाले, माझी भूमिका एकला चलो रे असली तरी मी पक्षासोबत आणि राजसाहेब यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले

Web Title :- Vasant More | vasant more slams mns leaders in pune over internal politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात; आईसह मुलीचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Bollywood Actress Above 40 But Not Married | चांगल्या मुलाच्या शोधात 40 च्या पुढे गेल्या ‘या’ सौंदर्यवती, दिसतात सुपर हॉट

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला