Vasant More | माजी नगरसेवक वसंत मोरेंना अखेर राज ठाकरेंचा निरोप; ‘शिवतीर्थ’वर दिलं निमंत्रण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा आदेश धूडकावल्याने माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना काल (गुरुवारी) मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नुतन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच रंगलं. यानंतर वसंत मोरे यांना राष्ट्रवादी (NCP) तसेच शिवसेनेकडून (Shivsena) ऑफर आली आहे. वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच आता त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरेंचा निरोप आला असून शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावलं आहे.

 

याबाबत वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले की, ”शिवसेनेसह सगळ्याच पक्षांनी आतापर्यंत ऑफर दिली आहे. ही ऑफर आता नाही तर आधीच्या 2017, 2019 निवडणुकांमध्येही आली. परंतु मी मनसेशी एकनिष्ठ असून पक्षाच्या चिन्हावर मी निवडून आलो. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत मांडले. मी राजसाहेबांना मेसेज केला होता. परंतु रिप्लाय आला नाही. मात्र मनसे नेते बाबू वागसकर (Babu Wagaskar) यांनी भेटून राज ठाकरेंचा (Raj Thackeray) निरोप दिला आहे. सोमवारी ‘शिवतीर्थ वर साहेबांनी भेटायला बोलावलं आहे.”

 

 

”पुण्यात नवनियुक्त शहराध्यक्ष झाल्यानंतर जो फटाके, गुलाल उधळलं ते कुठेतरी खटकलं. ते नको व्हायला हवं होतं. त्यामुळे खूप वेदना झाल्या. मी मनसेत आहे. पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आहे. मी 15 वर्ष सक्रीय राजकारणात आहे. माझी नाळ लोकांच्या तळाशी आहे. याठिकाणी मनसे जिवंत ठेवण्याचं काम मी करतोय. म्हणून मी खंत व्यक्त केली होती. विचार बदलले नाहीत. मी राजसाहेबांशी कट्टर आहे. साहेब माझी बाजू नक्कीच समजून घेतील,” असं वसंत मोरे म्हणाले.

 

पुढे वसंत मोरे म्हणाले, ”मी 15 वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून लोकांशी नाळ जोडली आहे. मला जो प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी मत व्यक्त केले. त्यावर माध्यमांमध्ये राजसाहेबांचा आदेश झुगारला अशा बातम्या आल्या. आमचा घरचा विषय आहे. मी साहेबांना भेटायला जाणार आहे. 15 वर्षात मी साहेबांना फोन केलाय, मेसेज टाकलाय त्यावर नेहमी रिप्लाय आलाय. माझ्याकडे राजसाहेबांच्या आठवणी खूप आहेत. मन विचलित होते तेव्हा साहेबांचे जुने फोन कॉल आहेत. साहेबांचा आवाज ऐकला तरी ‘बोल रे वसंत’ मग सगळं संपून जातं. 27 वर्ष पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे भावूक झालो होतो. हकालपट्टी हा शब्द माझ्या कार्यकर्त्यांना आणि मलाही खटकला.”

 

मनसे नेते बाबू वागसकर काय म्हणाले?

”वसंत मोरे यांच्याकडे शहर अध्यक्ष पदापेक्षा राज्याच सरचिटणीस पद आहे.
मोरे हे मनसेत आहे आणि पक्षातच राहतील.
वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर आल्यामुळे आम्ही आलो नाही.
मोरेंना कुठलीही ऑफर आली तरी मुख्यमंत्री म्हटले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही.
सोमवारी राजसाहेबांनी त्यांना भेटायला बोलावलं आहे.
वसंत मोरे हा मनसेचा चेहरा आहे.
त्यांच्यावर अन्याय झाला असं माध्यमात म्हटलं गेले.
राजकारणात आणि पक्षात काही गोष्टी घडत असतात.
वसंत मोरे हे भोळे आहेत. वसंत मोरे मनसेत आहेत आणि राहतील.
राजसाहेबांचे मोरेंवर खूप प्रेम आहे.
आम्ही डगमगू पण वसंत मोरे डगमगणार नाही.”

 

Web Title :- Vasant More | vasant more will arrive in mumbai to meet mns president raj thackeray on monday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा