Vasant Rathod | गुजरातमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकारच्या झटक्याने युवा खेळाडूचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन : Vasant Rathod | क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये क्रिकेट खेळताना एका सरकारी कर्मचाऱ्याला मैदानातच हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात त्याचा मैदानातच मुत्यू झाला. वसंत राठोड असे मृत पावलेल्या खेळाडूचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. यामध्ये वसंतची तब्येत अचानक खालावते आणि तो मैदानातच खाली बसतो आणि त्याच क्षणी त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा जाग्यावरच मृत्यू होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Vasant Rathod)

मृत संजय राठोड हे एसजीएसटी विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. हि दुर्दैवी घटना भाडज येथील डेंटल कॉलेजच्या मैदानावर घडली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि वसंत राठोड हा क्रीझजवळ गोलंदाजी करत होता, तेव्हा तो व्यवस्थित असल्याचा दिसत होता. अचानक त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो मैदानावरच बसला. यानंतर त्याच्या बाकी सहकाऱ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. (Vasant Rathod)

वसंत राठोड त्यावेळी खूप अस्वस्थ दिसत होता. तो कधी बसत होता तर कधी झोपताना दिसत होता.
यानंतर अचानक तो जमिनीवर झोपला. यावेळी त्याच्या जवळ त्याचे सहकारी होते.
यानंतर त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.
वसंत राठोड हा एसजीएसटीच्या युनिट 14 मध्ये कार्यरत होता. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Vasant Rathod | vasant rathod died of a heart attack while playing cricket in gujarat and the video is going viral