वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगळीकर यांना पितृशोक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त तहसीलदार वसंतराव गोपाळराव मुगळीकर यांचे शुक्रवारी (४ जानेवारी) दीर्घ आजाराने चिंचवड येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांचे ते वडील होत. वसंतराव मुगळीकर हे १९९६ साली लातूर येथे तहसीलदार पदावरून निवृत्त झाले.

मुंबई उच्च न्यायालयातील उपनिबंधक विनय मुगळीकर, पुण्यात पाटबंधारे विभागात उपअभियंता विश्वास मुगळीकर, ठाणे येथील राज्य कामगार विमा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुगळीकर व वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर ही चार मुले, त्यांच्या पश्चात पत्नी, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

Loading...
You might also like