धक्कादायक ! गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रकार, समलैगिंकांचा अड्डा उध्दवस्त

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मागील आठवड्यात एका 34 वर्षीय तरुणाच्या गुदमार्गात नारळ घुसवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता वाशीतील सागर विहार परिसरातील एका पडीक इमारतीमध्ये हा समलैगिंकांचा अड्डा चालत असल्याचे उघड झाले आहे. तसेच या ठिकाणी गुदमार्गात नारळ घुसवण्याचा खेळ देखील चालायचा.

 

मागील आठवड्यात एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता वाशी पोलिसांना या अड्ड्याचा तपास लागला. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर हा अड्डा चालत असे. याठिकाणी पोलिसांना विविध प्रकारचे आणि आकाराचे नारळ, पाईप आणि विविध वस्तू आढळून आल्या.

 

तसेच तेलासारखे द्रव्य देखील आढळून आल्याने पोलिसांना या ठिकाणी हा जीवघेणा खेळ चालत असल्याचे दिसून आले. तसेच या तरुणाबाबत नेमके काय घडले याची माहिती मात्र पोलिसांना अजूनही मिळालेली नाही. पोलिसांनी या गोष्टीचा तपास सुरु केला असून या भागातील सीसीटीव्ही व सीडीआरदेखील मिळवला आहे. तसेच हा पीडित तरुण मात्र सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत नाही, मात्र अत्याचार झाल्यानंतर आपण स्वतः या इमारतीत नारळ काढण्यासाठी गेलो होतो अशी माहिती तरुणाने दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी  या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असून या पीडित तरुणाने घटनास्थळाला भेट दिल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com