Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यात मदत करतो कापूर, जाणून घ्या ‘हे’ लाभदायक 7 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही घरात वास्तुदोष असल्यास सुख, शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते. वास्तुदोषामुळे वाढणार्या नकारात्मक उर्जेमुळे व्यक्तीच्या भाग्यावर वाईट परिणाम पडतो. सोबतच घरातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दोष दूर करण्यासाठी कापूर महत्वपूर्ण आणि उपयोगी मानला जातो. कापूरचे काही असे उपाय आहेत, जे वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करतात.
हे उपाय करा
1 जर घरात वास्तुदोष असेल तर सर्व खोल्यांच्या कोपर्यांमध्ये कापूरच्या वड्या ठेवा. जेव्हा या वड्या विरघळून संपतील तेव्हा त्या ठिकाणी दुसर्या वड्या ठेवा. यामुळे घरात राहणार्या लोकांवर वास्तुदोषाचा प्रभाव पडत नाही.
2 घरात रोज सकाळ-संध्याकाळ कापूर गावठी तूपात भिजवून जाळा आणि चारी बाजूला फिरवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सोबतच घरात सुख-शांती राहते.
3 रात्री स्वयंपाकाचे काम संपल्यानंतर एका स्वच्छ वाटीत लवंग आणि कापूर जाळणे सुद्धा लाभदायक मानले जाते. यामुळे घर-कुटुंबात भरभराटीसह अन्नधान्याचा साठा देखील नेहमी भरलेला राहतो.
4 अनेकदा कष्ट करूनही यश मिळत नाही किंवा काम होता-होता अडकते. अशावेळी वास्तुनुसार वाटीत नियमितपणे लवंग आणि कापूर जाळून घरात फिरवा. यामुळे अडचणी दूर होतात आणि कामे होऊ लागतात.
5 आंघोळीच्या पाण्यात कापूराच्या तेलाचे काही थेंब टाकल्यास उस्ताह, उर्जा येते. वास्तुनुसार असे केल्याने भाग्य सुद्धा चमकते.
6 घरात सकारात्मक ऊर्जेसाठी दररोज सकाळी किंवा सायंकाळी कापूर जाळून प्रत्येक कोपर्यात धूर पसरावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
7 घराचा अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते, शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते.