Vastu Tips : कर्जाच्या ओझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 वास्तु उपाय, दूर होईल दारिद्रय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही व्यक्तीला कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते. परंतु, अनेकदा परिस्थितीच्या समोर हताश होऊन कर्ज घ्यावे लागते. तर, आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने कर्जातून लवकर सुटका मिळणे सुद्धा अवघड होते. वास्तुदोष सुद्धा याचे कारण असू शकतो.

वास्तु शास्त्रानुसार अनेकदा व्यक्ती कर्जात इतका बुडतो की कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची पाळी येते. या स्थितीतून सुटका न मिळाल्यास व्यक्ती तणावात राहू लागतो. वास्तुनुसार जर छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर कर्जाचा भार कमी केला जाऊ शकतो.

1. वास्तुनुसार घरात बाथरूम दक्षिण-पश्चिम भागात असू नये. या दिशेला बाथरूम असल्यास कर्जात बुडू शकता. परंतु, दक्षिण-पश्चिम दिशेला बनवलेच असेल तर त्याच्या कोपर्‍यात एका वाटीत खडे मीठ भरून ठेवा. यामुळे वास्तुदोष दूर होतो.

2. वास्तुनुसार, जर कर्ज घेतले असेल तर त्याचा पहिला हप्ता मंगळवारी चुकवावा. असे केल्याने कर्जातून लवकर सुटक होते.

3. जर घरात-दुकानात काच किंवा आरसा लावलेला असेल तर त्यासाठी नेहमी उत्तर-पूर्व दिशा निवडा. असे केल्याने कर्जाचा भार वाढत नाही.

4. काही लोक जेवल्यानंतर खरकटे सोडून देतात. वास्तुनुसार असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे धनहानी होण्यासह दारिद्रय वाढते.

5. आपल्या घरात किंवा दुकानात लक्ष्मीमाता तसेच कुबेराची प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करून नंतर नियमित त्यांची पूजा करा. यामुळे लवकर कर्जमुक्ती होते.