Vastu Tips : पाकिटात चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; होईल आर्थिक नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुरुष आणि महिला सामान्यपणे आपल्या पाकिटात पैसे ठेवत असतात. पण एका व्यक्तीच्या पाकिटात पैसे टिकतच नव्हते. पण वास्तुशास्त्रानुसार, पाकिटासंबंधी काही बाबी लक्षात घेऊन पैशांची बचत करता येऊ शकते. तसेच वास्तुनुसार, पैशांशिवाय कोणत्याही अनावश्यक वस्तू पाकिट किंवा वॉलेटमध्ये ठेवणे अशुभ मानले जाते.

‘या’ वस्तू पाकिटात कधीही ठेवू नये…

  • वास्तुनुसार, पाकिट किंवा वॉलेटमध्ये कधीही चावी ठेऊ नये. पाकिटात चावी ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
  • पाकिटात पैशांसह कागद किंवा बिल यांसारख्या वस्तू ठेवू नये. असे केल्याने नकारात्मक गोष्टी वाढू शकतात आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
  • पाकिटात पैसे ठेवताना नीट ठेवावेत. नोटांची कोणत्याही प्रकारे घडी करू नये.
  • आपल्या घरातील मृत व्यक्तीचा फोटो आठवण म्हणून ठेऊ नये.
  • कोणत्याही प्रकारे कर्ज आणि व्याजाची रक्कम पाकिटात ठेऊ नये.
  • पाकिटात मुठभर तांदूळ ठेवल्याने पैशांची बचत होऊ शकते. तसेच पैसेही लवकर संपणार नाहीत.
  • तसेच पाकिट फाटले असेल तर ते लगेच बदलावे. फाटलेले पाकिट वापरू नये.