Vastu Tips : घरात भगवान शंकराचे छायाचित्र लावताना करू नका ‘या’ चूका, पडू शकतात महागात

नवी दिल्ली : वास्तु शास्त्राच्या नियमानुसार घरात देवाचे प्रतिक चिन्ह, मूर्ती किंवा छायाचित्र लावल्याने सकारात्मकता वाढते. वाईट काळ लवकर टळतो, तसेच अनेक समस्या दूर होतात. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की, भगवान शंकराच्या इच्छेनेच या संपूर्ण सृष्टीची रचना ब्रह्मदेवांद्वारे करण्यात आली आहे. याच कारणामुळे बहुतांश लोक घरात भगवान शंकराचे छायाचित्र आवश्यक लावतात. घरात भगवान शंकराचे छायाचित्र ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे वास्तु शास्त्रानुसार जाणून घेवूयात…

* भगवान शंकराला संहार देवता म्हटले जाते. भगवान शंकर सौम्य आकृती आणि रौद्ररूप दोन्हीसाठी प्रसिद्ध आहेत. वास्तु शास्त्रानुसार, घरात देवी-देवतांची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक उर्जा येत नाही, परंतु मूर्ती ठेवताना जे नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जर चुकीची दिशा किंवा चुकीच्या पद्धतीने घरात देवाची मूर्ती लावलेली असेल तर जीवनात समस्यांचे कारण बनू शकते.

* लक्षात ठेवा ज्या छायाचित्रात भगवान शंकर माता पार्वती, पुत्र गणेश आणि कार्तिकसोबत असतील म्हणजे संपूर्ण कुटुंबसोबत असेल तर ते घरात लावणे शुभ आहे. यामुळे घरात वाद-विवाद होत नाहीत. सोबतच घरात मुले अज्ञाधारक होतात.

* भगवान शंकरांचे निवास कैलास पर्वत उत्तर दिशेला आहे. या कारणामुळे भगवान शंकराचे छायाचित्र उत्तर दिशेला लावणे चांगले असते. भगवान शंकराचे क्रोध मुद्रेतील छायाचित्र कधीही लावू नये. हे विनाशाचे प्रतिक आहे.

* घराच्या उत्तर दिशेला भगवान शंकराचे छायाचित्र अशा ठिकाणी लावा जिथे घरात येणारे जाणारे सर्व लोक महादेवाचे दर्शन करू शकतील. यामुळे लोकांशी तुमचे नाते नेहमी चांगले राहील.

* ज्या छायाचित्रात भगवान शंकर खुश दिसत असतील ते छायाचित्र घरात लावणे शुभ आहे. नंदीवर विराजमान महादेवाचे छायाचित्र घरात लावल्याने मुलांचे ध्यान वाढते.

* महादेवाचे छायाचित्र किंवा मूर्ती ज्या ठिकाणी लावलेली असेल ती जागा स्वच्छ असावी. या ठिकाणी अस्वच्छता असल्यास दोष वाढतात. ज्यामुळे धनहानी होऊ शकते.

* भगवान शंकराचे उभ्या मुद्रेतील छायाचित्र कधीही आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावू नये.