Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीची दिशा ‘अशी’ असावी, अन्यथा नुकसान होईल

पोलीसनामा ऑनलाइन – आजची तरुण पिढी आपल्या देशाचे भविष्य आहे. तुम्हाला आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं असं वाटत असेल, तर त्यांच्या खोलीची रचना योग्य प्रकारे असली पाहिजे. आज आपण वास्तुशास्त्रानुसार बोलू, मुलांच्या खोलीची योग्य दिशा काय असायला हवी…

घरात मुलांची खोली पूर्व, उत्तर, पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावी.

मुलांचे डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिमेस असले पाहिजेत.

मुलाच्या खोलीचा दरवाजा पूर्वेकडे असल्यास बेड दक्षिणेकडून उत्तरेकडे असावा.

शौचालयाजवळ कधीही वाचनाची खोली असू नये. यासह खोलीतील बुक रॅक किंवा कपाट फक्त पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

घरात जागा नसल्यामुळे जर आपल्याला बेडरूममध्ये अभ्यास करावा लागत असेल तर वाचन टेबल, लायब्ररी आणि रॅक पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशेने ठेवा, परंतु अभ्यास करत असतानाही चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

वायव्य दिशेची खोली विवाह करण्यायोग्य मुलीसाठी खूप फायदेशीर आहे.

वायव्य दिशेचे तत्व वायू असं आहे त्यामुळे त्या दिशेला झोपल्यास मुलींचे लग्न लवकर होते.

मुलांच्या खोल्यांमध्ये हिंसक चित्रे ठेवू नका.

अभ्यासाच्या टेबलावर ग्लोब किंवा कॉपर पिरामिड ठेवणे फायद्याचे आहे तसेच नकारात्मक उर्जा दूर ठेवते.

ज्या मुलांना अभ्यासाची भावना नसते त्यांच्या खोलीत मोरांचे पंख ठेवा.

अभ्यास करणार्‍या मुलांच्या खोलीत सरस्वतीचा फोटो ठेवावा.