Vastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय ! वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश

पोलीसनामा ऑनलाइन – आयुष्यात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसेल, तर तो कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आत्मविश्वासाच्या अभावामुळे व्यक्तीला नेहमी त्याचे म्हणणे योग्य पद्धतीने मांडण्यात अडचणी येतात. वास्तुनुसार काय करावे, जेणेकरून आपल्या जीवनातील आत्मविश्वासाचा अभाव दूर होईल, हे जाणून घेऊया.

* घराच्या पूर्व दिशेला पितळ धातूपासून बनवलेला वाघ ठेवल्याने व्यक्तीला प्रचंड आत्मविश्वास मिळतो.
* अभ्यास करताना पूर्व दिशेला तोंड करून अभ्यास केल्यास सकारात्मकता येते आणि आत्मविश्वास वाढतो.
* सर्वप्रथम घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेकडील खिडक्या आणि दारे उघडा, कारण या दिशांनी विश्वातील सकारात्मक उर्जा येते.
* आपल्या टेबलवर उजवीकडे क्रिस्टल ट्री ठेवा.
* कार्यालयात काम करत असल्यास आपल्या टेबल-खुर्चीजवळ क्रिस्टलचे शोपीस, रॉक किंवा बॉल ठेवा.
* आत्मविश्वासाच्या वाढीसाठी टेबलसमोर बसायची खुर्ची किंचित उंच ठेवा.
* लोकांवर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी पलंगाच्या वरच्या बाजूला विशाल खडक आणि पर्वताचे चित्र असलेले एक मोठे पोस्टर लावा, ज्यात पाणी दाखवले गेले नसेल, कारण पर्वत आणि खडक एकीकडे भक्कम पाया आणि दृढनिश्चय वाढवतात, तर दुसरीकडे पाणी घटक  द्रवरूपतेचे प्रतीक आहे, त्यामुळे पाण्याचे चित्र घराच्या उत्तरेकडील भिंतीवरच लावणे फायदेशीर असते.
* घराच्या एका खोलीत दर तासाला वेळ सांगणारे पेंडुलमयुक्त घड्याळ लावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like