वास्तू शास्त्र (Vastu Tips) : करा हे ‘वास्तू’ उपाय, राहाल संसर्गजन्य आजारापासून दूर

देशाच्या अनेक राज्यात जोरदार पाऊस आणि पूराची स्थिती आहे. अशावेळी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. काही वास्तू उपाय करून तुम्ही संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकता. वास्तूशास्त्रानुसार घराच्या कोणत्या भागात संसर्गजन्य आजारांचा किती परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेवूयात…

घशात त्रास होणे सुद्धा संसर्गजन्य आजाराचे लक्षण आहे. ग्रहांवरून समजून घ्यायचे तर घशात होणार्‍या त्रासाचा कारक शुक्र ग्रह आहे. घशात खवखव आणि स्वरात बदल याच्याशी सुद्धा शुक्राचा संबंध आहे. तापमानाचे कारक ग्रह सूर्य आणि मंगळ आहेत. शरीरात वेदना होणे हा वात दोष आहे. वाताचा कारक गुरू ग्रह आहे.

वास्तूनुसार ईशान्य कोपरा किंवा उत्तर-पूर्व कोपरा गुरु ग्रहाचे क्षेत्र आहे. या दिशेला साफ-सफाई आणि खुलेपणामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. कोरोना रूग्णाचे या क्षेत्रात राहणे परिसर दुषित करते. यामुळे रूग्णाचा त्रास वाढतो. शिवाय अन्य लोकांना सुद्धा संसर्गाचा धोका वाढतो. यासाठी ईशान्यची विरूद्ध दिशा नैऋत्य कोपरा म्हणजे दक्षिण-पश्चिममध्ये रूग्णाला ठेवावे. येथे आरामसुद्धा जास्त मिळेल.

शुक्राची दिशा दक्षिण-पूर्व म्हणजे आग्नेय कोपरा आहे. कफ प्रकोपाने पीडित कोरोना रूग्णांना येथे ठेवू नये. आग्नेय कोपर्‍याची विरूद्ध दिशा वायव्य कोपर्‍यात रूग्णाची वव्यस्था करा. वायव्य कोपरा चंद्राचे क्षेत्र आहे. रूग्णाला जलोपचार म्हणून गरम पाणी, काढा चहा द्यावा.

संसर्गजन्य आजारापासून सामान्स बचाव करण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम दिशेला जास्तीत जास्त राहाण्याची सवय करा. झोपताना डोक दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवा. लक्षात ठेवा पायाकडे खिडकी किंवा दरवाजा असू नये.

संसर्गजन्य आजारांपासून बचावात शनी ग्रह प्रभावशाली आहे. घरात ज्या ठिकाण ऊन येते त्या भागात सायंकाळी थोडावेळ थांबा. खुल्या आणि कमी गर्दीच्या ठिकाणी राहात असाल तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करत मैदान आणि रस्त्यावर मास्क लावून चालू शकता.