Vastu Tips : ‘या’ पध्दतीनं करा मोरांच्या पिसांचा वापर, उघडेल ‘नशीब’ अन् व्हाल ‘धनवान’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – मोराच्या पिसांमध्ये सर्व देवी-देवता आणि नवग्रह असतात. प्रत्येक धर्मात मोरपीस वापरले जाते. मोरपीस हे अनेक देवतांचे आवडते आभूषण आहे. भगवान श्रीकृष्ण, माता सरस्वती, माता लक्ष्मी, इंद्रदेव, शिवपुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश सर्वांनाच मोरपीस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रिय आहेत. म्हणूनच ही पिसे जीवनाची दिशा आणि दशा बदलण्यात उपयुक्त मानली जातात.

जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, तर तुम्ही आपल्या ऑफिस किंवा लॉकरमध्ये दक्षिण-पूर्व दिशेला मोरपीस ठेवा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्याकडे कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि थांबलेले पैसेही तुम्हाला सहजपणे मिळतील.

बेडरूमच्या पूर्वेकडील किंवा दक्षिण-पूर्व दिशेला मोरपीस लावल्याने थांबलेली सर्व काम पूर्ण होतात.

ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांनी खोली किंवा पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवावे. असे केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.

मुख्य गेटवर गणेशमूर्तीसह मोरपीस ठेवल्याने घरातून सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही.

जर तुमच्या घरात मोरपीस असतील, तर कोणतीही वाईट शक्ती आत येऊ शकत नाही. हे तुमच्या घरात सकारात्मक उर्जा कायम ठेवते.