Vastu Tips : मोर पंख घरात ठेवल्यानं काय होतं ? वास्तु दोषाचं निराकरण करण्यास होते मदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन : मानवी जीवनामध्ये प्रकृती आणि त्याशी निगडित वस्तूंना विशेष प्राधान्य आहे. स्वतः देवी देवतांने सुद्धा प्रकृतीचे महत्व सांगून तिची पूजा केलेली आपल्याला धार्मिक ग्रंथात पाहायला मिळते. काही नैसर्गिक वस्तू ज्या प्रकृतीशी जोडल्या आहेत अशांना देवी देवता स्वतः धारण करतात. व अशा वस्तूंचे महत्त्व मानवी जीवनामध्ये खूप असते या वस्तू मानवी जीवनात शुभ असतात.

अशीच एक वस्तू म्हणजे मोरपंख जी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे आणि स्वतः श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर मोरपंख धारण करतो तसेच मोरपंख हा श्रीकृष्णाच्या जीवनातील अभिन्न हिस्सा आहे. असे मत ज्योतिषाचार्य अनिल व्यास यांनी मांडले. ते म्हणाले की, मानवी जीवनाचा उत्कर्ष करायचा असेल तर आपणही आपल्या जीवनात मोरपंख धारण करावा. मोरपंखाचे अनेक फायदे यावेळी त्यांनी सांगितले. मोरपंख जर आपण घरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तूदोष दूर होतील तसेच घरात सुख समृद्धी आणि धन संपदा नांदते. मोरपंखाला जर पूजेच्या ठिकाणी देवघरात ठेवले तर पुत्रप्राप्ती लवकर होते. नकारात्मकता जर घरात येत असेल तर पाच मोरपंख घरात ठेवा त्याने घरामध्ये आनंद, सकारात्मक ऊर्जा, नात्यांमध्ये प्रेमवृद्धी होते. एवढेच काय तर आजारावर देखील मोरपंखाचा चांगला फायदा होतो.असेही व्यास यावेळी म्हणाले.