Vastu Tips : नवीन वर्षापूर्वी घरात ठेवलेल्या ‘या’ अशुभ वस्तू बाहेर काढा, व्हाल मालामाल

नवी दिल्ली : Vastu Tips | 2022 चे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. केवळ काही दिवसच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिल्लक आहेत. सर्वांना वाटते की, सर्व अडचणी, समस्या मागेच राहाव्यात आणि येणार्‍या वर्षात नवीन उर्जेसह पुढे जावे. वास्तुशास्त्रानुसार, नकळत आपण काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे घराकडे आनंद पाठ फिरवतो. (Vastu Tips)

 

काही गोष्टींमुळे नकारात्मक उर्जा अशाप्रकारे प्रभाव करते की लाख प्रयत्न करून सुद्धा घरात शांतता राहात नाही आणि लोकांच्या जीवनात आर्थिक आणि आरोग्यसंबंधी समस्या येऊ लागतात. तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार, सुख-समृद्धी मिळवण्यासाठी नवीन वर्षात वास्तुनुसार कोणते विशेष उपाय करावे ते जाणून घेवूयात. (Vastu Tips)

 

करा हे उपाय

1- तुटलेला पलंग :

तुटलेला पलंग घरात ठेवणे अशुभ आहे. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येतात. घरात शांतता राहात नाही. लक्ष्मी पाठ फिरवते. पलंग तुटला असेल तर तो दुरूस्त करा किंवा तुटलेला पलंग हटवून नवीन घ्या.

 

2- काचेचे तुटलेले सामान :

वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेले काचेचे सामान ठेवणे अतिशय अशुभ मानले जाते. हे सामान वापरात नसले तरी त्याचा परिणाम होतो. यामुळे वास्तु दोष लागतो आणि मानसिक तणाव आणि समस्या होतात.

 

3- तुटलेली फ्रेम :

तुटलेली फोटो फ्रेम, खराब इलेक्ट्रोनिक सामान इत्यादी सुद्धा नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असे सामान घरात ठेवल्याने दारिद्रय येते.

 

4- वीजेची तार :

घराची खराब झालेली वायरिंग केल्यानंतर शिल्लक विजेच्या तारा नेहमी लोक सांभाळून ठेवतात.
वास्तुनुसार विजेची खराब किंवा शिल्लक तार घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

 

5- मुख्य दरवाजा :

घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. येथे अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्या.
दरवाजा कोणत्याही प्रकारे तुटलेला-फुटलेला नसावा.

 

6- लावा तोरण :

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुख्य दरवाजावर अशोकाच्या पानांचे तोरण लावा.
याशिवाय मुख्य दरवाजावर झेंडूच्या किंवा गुलाबाच्या फुलांच्या माळा सुद्धा लावू शकता.

 

Web Title :- Vastu Tips | 2022 vastu tips these inauspicious things kept in the house do it out immediately before new year 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा