घरात पैसा-अडका टिकत नाही तर मुख्य प्रवेशव्दारावर करा हा उपाय, होईल बरकत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि संपत्ती मिळण्याची इच्छा असते. परंतु बर्‍याच वेळा घराच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावा लागते. यामागील कारण वास्तू दोष देखील असू शकतो. तसेच हे धनाची देवता लक्ष्मीची नाराजीकडे देखील लक्ष वेधते. अशा परिस्थितीत घरात ताणतणाव असल्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येतात. अशा परिस्थितीत, ज्योतिष आणि वास्तूशी संबंधित काही उपायांचा अवलंब करून हा त्रास टाळता येऊ शकतो. तसेच, देवीचा दिवस शुक्रवार असल्याने या दिवशी हा उपाय करणे शुभ ठरेल. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल …

शुक्रवारी पांढरे कपडे घाला :
मान्यतेनुसार देवी लक्ष्मी शेण, शंख, आवळा आणि पांढर्‍या वस्तूंमध्ये वास्तव्य करते. अशा वेळी या गोष्टी खास करून घरी ठेवा. तसेच शुक्रवारी देवीच्या दिवशी पांढर्‍या रंगाचे कपडे घाला.

या उपायाने पैशाची होईल बचत
बरेच लोक हातात आणि घरात पैसे नसल्याची तक्रार करतात. अशा परिस्थितीत शुक्रवारी सकाळी आंघोळ करुन घराच्या मुख्य गेटवर गुलाल शिंपडा. त्यानंतर देेेशी तुपाचा दोनमुुुखी दिवा लावा आणि आपल्या मनात देवीची प्रार्थना करा. जेव्हा दिवा थंड होईल, तेव्हा त्यास वाहत्या पाण्यात वाहू द्या. यामुळे पैसे नसल्याचा त्रास दूर होईल.

श्रीयंत्राची स्थापना
लक्ष्मी देवीला श्रीयंत्र खूप प्रिय आहे. अशा स्थितीत शुक्रवारी घराच्या उत्तरेकडील बाजूस हे स्थापित करा. तसेच रोज त्याची पूजा करावी. याद्वारे देवी लक्ष्मी पैशाशी संबंधित अडचणी दूर करेल. तसेच घरात असलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत बदलेल.

हे काम करेल यशस्वी
कोणत्याही महत्त्वपूर्ण कामास जाण्यापूर्वी देवीला दही किंवा कोणतिही पांढरी गोड मिठाई अर्पण करा. मग ते प्रसाद म्हणून खा आणि कामावर जा. यामुळे लवकरच कामांमध्ये यश मिळेल. वाटेत प्रगतीचा मार्ग खुला होईल.

पैसे मिळवण्यासाठी करा हे काम
लक्ष्मी देवीसमोर गायीच्या तूपाचा द्विमुखी दिवा लावून पूजा करावी. यासह, पैशांची कमतरता दूर होईल आणि आपल्याला पैसे मिळतील. तसेच, देवी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न होईल. या उपायाने आनंद आणि समृद्धी मिळेल

पिंपळाच्या झाडामध्येही देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो. अशा वेळी लोखंडी भांड्यात पाणी, साखर, देसी तूप आणि दूध मिसळा आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या. हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख – समृद्धी, शांती आणेल.