वास्तु टिप्स : ‘या’ 7 उपायांनी घरात सासू-सूनेची भांडणे होतील बंद, वाढेल प्रेम

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सासू-सूनेचे नाते म्हणजे थोडे आंबट, आणि थोडे गोड. परंतु अनेकदा या नात्यात इतका कडवटपणा येतो की, नाते ओझे वाटू लागते. नात्यात अंतर जास्त वाढल्याने घरात नकारात्मकतेचे वातावरण तयार होते, ज्यामुळे केवळ सासू-सूनच नव्हे, तर घरातील अन्य सदस्य सुद्धा उदास राहू लागतात, निराशेचे सावट दिसून येते. यासाठी जरूरी आहे की, दोघींमध्ये छोटे-छोटे वाद चालतच राहतील, परंतु तरीही दोघींमध्ये प्रेम आणि सन्मान असायला हवा. जर तुमच्या नात्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त आहे, विश्वास कमी आणि मतभेद जास्त असतील तर वास्तूशास्त्रानुसार कोणते उपाय या नात्यात गोडवा आणू शकतात, ते जाणून घेवूयात…

सासू-सूनेसाठी या वास्तु टिप्स

1 तुमच्यात सतत मतभेद होत असतील तर नात्यात प्रेम वाढवण्यासाठी दोघींच्या खोलीत लाल रंगाची फोटो फ्रेम लावा, ज्यामध्ये दोघींचा सोबत काढलेला फोटा लावा.

2 जर तुमच्या किचनच्या कॅबिनेटचा रंग काळा असेल तर तो ताबडतोब बदला. काळ्या रंगाचे रेडिएशन महिलांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच नात्यात सुद्धा कडवटपणा येतो.

3 घरात चंदनाची मूर्ती ठेवल्याने सुद्धा नाते सुंदर होऊ शकते. मात्र, मूर्ती अशा ठिकाणी ठेवा, जेथे सर्वांची नजर तिच्यावर जाईल. यामुळे दोघींमधील भांडणे हळुहळु कमी होतील.

4 घरात डस्टबीन कुठे ठेवले जाते, हेदेखील महत्वाचे आहे. कारण याचा थेट परिणाम म्हणजे नात्यातील तणाव आहे. डस्टबीन घराच्या उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. यामुळे नात्यातील कडवटपणा गोडव्यात बदलेल.

5 दक्षिण-पश्चिम दिशेला डोमिनेटिंग डायरेक्शन मानले जाते. आणि यामुळे घरात सासू-सासर्‍याची खोली साऊथ वेस्टमध्ये असावी. अन्यथा सासू-सूनेची भांडणे होऊ शकतात.

6 जर सासू-सूनेला आपल्या नात्यात प्रेम काय ठेवायचे असेल तर घरात गुलाब, चंपा, चमेलीची फूले खासकरून ठेवली पाहिजेत.

7 तुळशीचे रोप लावून त्याची पूजा करा.

You might also like